Bipin Joshi is an independent software consultant and trainer by profession. Having embraced the Yoga way of life he is also a yoga mentor, meditation teacher, and spiritual guide to his students. He is a prolific author and writes regularly about software development and yoga on his websites. He is programming, meditating, writing, and teaching for over 26 years. More details about him are available here.
The basic technique of Ajapa Dhyana as taught by him is available under "Basic Technique" menu on the left. If you are interested in learning advanced techniques of Ajapa Yoga or wish to seek guidnace from him, more details are available under "Online Course" and "Registration" menus.
मानवी जन्माचं सार्थक करण्याचे जे अध्यात्म मार्ग भारतवर्षात विकसित झाले त्यातील एक प्रमुख मार्ग म्हणजे कुंडलिनी योग. मंत्रयोग, हठयोग, लययोग आणि राजयोग अशा चार प्रकारांत विभागलेला हा मार्ग खरंतर आध्यात्मिक प्रगतीचा राजमार्गच आहे.
अजपा योग हा ह्या सगळ्यांचा मुकुटमणी आहे. प्राचीन योगग्रंथांनी एकमुखाने गौरवलेली ही "न भूतो न भविष्यति" अशी साधना पध्दती आहे. ताणतणावांनी आणि नाना प्रकारच्या चिंतांनी ग्रस्त करणाऱ्या आधुनिक जीवनशैलीसाठी तर अजपा योग वरदान स्वरूप आहे.
तुम्हाला ह्या मार्गावर यावं अशी इच्छा होत आहे हा तुमच्या दृष्टीने मोठा शुभसंकेतच आहे. विषयाच्या खोलात जाण्याआधी अंतरीचे दोन शब्द सांगावे म्हणून हा "मनोगत" प्रपंच.