Welcome to Ajapa Yoga by Bipin Joshi
Ajapa Yoga is an ancient technique of meditation and mindfulness that takes your mind into deep meditative states quickly and effectively. Ajapa is the crest jewel of Yoga Vidnyana and is an important practice of Shaiva, Datta, and Natha sampradaya. Experience the inner fountain of bliss. Understand the metaphysics and cosmic connection of Chakras and Kundalini. Online guidance, mentoring, and initiation sessions for selected individuals and small groups by Bipin Joshi.

Ajapa Dhyana and Kriya ~ Online Guidance and Initiation

अनया सदृशी विद्या अनया सदृशो जपः ।
अनया सदृशं ज्ञानं न भूतं न भविष्यति ॥
~ योगचूडामणी उपनिषद
No learning higher than Ajapa, no japa higher than Ajapa, no knowledge higher than Ajapa ever existed in the past nor will exist in the future.
~ Yogachudamani Upanishad
Ajapa Yoga as taught by Bipin Joshi is built on the foundations of time proven principles of classical yoga system of India. This course teaches you a powerful sequence of Kriyas consisting of energized Mantras, Pranayamas, Mudras, and Meditations knitted together to maximize their benefits. Together these Kriyas purify the energy channels, calm the mind, open the Chakras and awaken the Kundalini leading to spiritual transformation of the practitioner.

Manage stress and work pressures
Become more productive and energetic
Improved focus and grasping
Promotes healing and rejuvenation
Open Chakras and awaken Kundalini
Foundation for spiritual transformation
Spiritual remedies and practical tips


About the Mentor - Bipin Joshi

Bipin Joshi is an independent software consultant, trainer, author, yoga mentor, and spiritual guide. He embraced the path of classical Yoga in the year 1995 and teaches Kundalini Kriyas and Ajapa Meditation to selected individuals. His style of teaching presents an integrated and holistic approach to the subject and consists of energized Mantras, Pranayamas, Mudras, and Meditations.

Although Bipin got introduced to yoga during his childhood, his real journey on the path of yoga and spirituality started when he miraculously came across Dnyaneshwari written by Saint Dnyaneshwara, a 13th century yogi of the Nath tradition. The poetic rendering of the Kundalini Yoga from Dnyaneshwari mesmerized him completely and he took to the practice of yoga as described in the ancient yoga texts. In due course of time he received intense Shaktipata and Swapna Diksha from his Ishtam followed by Kundalini awakening in the temple of Lord Shiva situated at Tryambakeshwara.

In addition to authoring 12+ programming books for international publishers such as WROX and Apress, Bipin has authored two books - Devachya Davya Hati and Nath Sanketinchaa Danshu - in Marathi elaborating his own experiences of spiritual awakening and the path of Kundalini Yoga.

Bipin has been awarded with prestigious Most Valuable Professional (MVP) status by Microsoft and is a former Microsoft Certified Trainer (MCT). You may read more about him here.देवाच्या डाव्या हाती
कशी होते कुंडलिनी जागृती? जागृती नंतर पूढे काय? प्राचीन योगग्रंथात उल्लेखलेले अनुभव आजही खरोखरच येतात का? या सर्व प्रश्नांची उत्तरे देणारे अनुभव कथन. एक नवखा साधक ते योगी या प्रवासात लेखकाला आलेल्या अडचणी आणि त्याने मोठ्या जिद्दीने त्यांवर केलेली मात याचे प्रभावी वर्णन या पुस्तकात आढळते. लेखक बिपीन जोशी यांचे विस्मयकारक स्वानुभव आणि प्रभावी मार्गदर्शन. अधिक वाचण्यासाठी येथे जा.
नाथ संकेतींचा दंशु
कुंडलिनी योगमार्ग विनाकारण गुढतेच्या आणि क्लिष्टतेच्या वलयात झाकोळला गेला आहे. सर्वसामान्य संसारी साधक कुंडलिनी योगमार्गापासून दूरच राहिला आहे. सर्वसामान्य साधकाला समजतील, जमतील आणि फायदा मिळवून देतील अशी मूलतत्वे आणि साधना यांचे सहज सोप्या भाषेत विश्लेषण करणे हे या पुस्तकाचे मुख्य उद्दीष्ट आहे. लेखक बिपीन जोशी यांचे प्रभावी आणि स्वानुभवाधिष्ठित मार्गदर्शन. अधिक माहितीसाठी येथे जा.


Latest Yoga and Spirituality Articles

कौन हमारा इष्ट है
नाथ साहित्यात योगमार्गी शिकवण ही फक्त सूत्रबद्ध ग्रंथांतच भरलेली आहे असे नाही. अगदी वरकरणी असंबद्ध आणि अर्थहीन वाटणाऱ्या शाबरी मंत्रांमध्ये सुद्धा कुंडलिनी योग, प्राण विद्या, आणि नाथ विज्ञानाचे धागेदोरे गुंफलेले आहेत. अशाच एका शाबरी मंत्रात खालील गुरु-शिष्य संवाद आढळतो.
Posted On : 10 Dec 2018
सुकृत आणि दुष्कृत
फार जुनी गोष्ट. एकदा गोरक्षनाथ एका गावाहून दुसऱ्या भटकंती करत होते. वाटेत एके ठिकाणी त्यांना एक गांजा विकणाऱ्या व्यापाऱ्याचे दुकान दिसले. ते त्या गांजा विकणाऱ्याकडे गेले. म्हणाले एक तोळा दे. दुकानदार गोरक्षनाथांच्या अंगावर खेकसला.
Posted On : 03 Dec 2018
जीवो जीवस्य जीवनम्
गेल्या शनिवारची गोष्ट. एका जुन्या घराच्या खिडकीत मी उभा होतो. घराच्या मागे थोडी झाडी आहे म्हणून जरा न्याहाळत निवांत उभा होतो. एका मोठ्या झाडाची लांबलचक फांदी माझ्या बरोब्बर समोर होतो. त्या फांदीवर सकाळचे मस्त कोवळे उन पडले होते. काही मिनिटांनी त्या फांदीवर एक इवलीशी खार खाद्य शोधत शोधत आली. ती ओरडतांना तिची गोंडेदार शेपटी लयबद्ध पद्धतीने वर खाली होत होती. आपल्याच शोधात गर्क असलेली खारुताई त्या मोठ्या फांदीवर बागडत होती. कोवळ्या स्वच्छ उन्हात तिच्या पाठीवरील रामाची शाबासकी मोठी सुंदर आणि तजेलदार दिसत होती.
Posted On : 26 Nov 2018
इच्छापूर्ती मंत्र आणि प्रत्यक्षीकरण मंत्र
भारतीय जनमानसावर प्राचीन काळापासूनच मंत्र आणि मंत्रशक्ती यांचा एक अद्भुत पगडा बसलेला आपल्याला दिसून येतो. आजच्या विज्ञानयुगातही तो कमी झालेला दिसत नाही. अध्यात्ममार्गावर बहुतेक साधकांची पहिली साधना काय असते तर कोणत्यातरी मंत्राचा जप करणे. घरात अथवा देवळात अशी जपमाळा फिरवणारी मंडळी आपण नेहमी पहातो. आता या मंत्रांनी खरोखर काही फायदा होतो का हा ज्याच्या त्याच्या विश्वासाचा आणि श्रेद्धेचा भाग आहे.
Posted On : 19 Nov 2018
स्वतःच्या सद्गुरूंना ओळखा
कार्तिक शुद्ध दुर्गाष्टमी (या आठवड्यात १६ नोव्हेंबर २०१८ रोजी) म्हणजे सद्गुरू श्रीशंकर महाराजांचा प्रगट दिन. महाराज वेशभूषेने नसले तरी मनाने नाथपंथी होते. त्यांचे भक्त त्यांना भगवान श्रीशंकराचा अवतार मानतात. या अवलियाच्या आयुष्यातील अनेक लीला प्रसंग आपल्याला थक्क तर करून टाकतातच पण त्याही पेक्षा जास्त अंतर्मुख करून सोडतात. असाच एक छोटा पण फार उद्बोधक प्रसंग...
Posted On : 12 Nov 2018
योग्यासाठी तपश्चर्या आवश्यक
मच्छिंद्रनाथांनी बद्रिकाश्रमात बारा वर्षे तपाचरण केले. योग्य वेळ आल्यावर त्यांची आणि भगवान दत्तात्रेयांची गाठ पडली. दत्तात्रेयांनी त्यांना शिष्य म्हणून स्वीकारले. त्यांना दीक्षा दिली आणि सर्व प्रकारच्या विद्या शिकवल्या. गंमत बघा की खरंतर मच्छिंद्रनाथ म्हणजे अवतारी सत्पुरुष. मच्छिंद्रनाथांनी आपल्या जन्मापूर्वीच मच्छीच्या पोटातूनच गुढातीगुढ आणि योगीगम्य असे शंकर-पार्वती संभाषण श्रवण केले होते. त्याचे आकलनही त्यांना झाले होते. परंतु तरीही त्यांनी तब्बल बारा वर्षे तपाचरण अंगिकारले.
Posted On : 01 Nov 2018
मच्छिंद्रनाथांचा कौलाचार
नाथ पंथाचा आचार-विचार म्हटलं की लोकांना गोरक्षनाथांचा सिद्ध-सिद्धांत-पद्धती आठवतो. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक असणाऱ्या गोरक्षनाथांनी लिहिलेला सिद्ध-सिद्धांत-पद्धती हा नाथ पंठीयांसाठी प्रमाणग्रंथ आहे हे खरेच परंतु नाथ संप्रदायाचा सखोल अभ्यास केल्यास आपल्याला त्याची पाळेमुळे मच्छिंद्रनाथांच्या मूळ पंथाशी अर्थात कौलमार्गाशी घेऊन जातात. कौलामार्गाचे जे आ
Posted On : 10 Oct 2018
पितृपक्ष आणि अजपा योग
पितृपक्ष सुरु होत आहे. अनेक घरांमधून श्राद्ध-तर्पणादी क्रिया करण्यात येतील. काही जण अशा क्रिया केवळ प्रथा म्हणून करतात तर काही जण पितृदोष निवारणार्थ करतात. असं म्हणतात की ज्यांच्या पूर्वजांचे श्राद्धसंस्कार नीट झालेले नसतात किंवा त्यांच्या इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतात त्यांच्या ज्योतिषीय जन्मकुंडलीत त्याची काही चिन्ह प्रकट होत असतात. त्यालाच ज्योतिषीय भाषेत पितृदोष म्हणतात. येथे हे जाणून घ्यायचे आहे की अजपा योगसाधनेद्वारा आपण आपल्या पूर्वजांचे कल्याण साधू शकतो का? त्यांच्यासाठी प्रार्थना करू शकतो का?
Posted On : 25 Sep 2018
सॅाफ्टवेअर डेव्हलपर्ससाठी बुद्धीवर्धक दहा आयुर्वेदिक सोपे उपाय
सॅाफ्टवेअर डेव्हलपमेंट हे असं क्षेत्र आहे की जिथे कायम नवीन-नवीन गोष्टी शिकाव्याच लागतात. एवढंच नाही तर सॅाफ्टवेअर लिहित असतांना सुद्धा पदोपदी मेंदूचा आणि बुद्धीचा कस लागत असतो. त्याच्या जोडीला दैनंदिन जीवनातील ताण-तणाव, चिंता, काळज्या असतातच. या सर्व परिस्थितीवर मात करायची असेल तर सॅाफ्टवेअर डेव्हलपर्सकडे सुदृढ आणि निकोप मेंदू आणि बुद्धी असणे आवश्यक ठरते.
Posted On : 06 Sep 2018
श्रावणातील सर्वोत्तम उपासना
आपल्याकडे श्रावण १२ ऑगस्ट रोजी सुरु होत आहे. काळ-परवा एका अजपा योग स्टुडंटने विचारले - "सर, यावर्षी श्रावणात काय विशेष उपासना करू?". असं कोणाला काही उपासना वगैरे सांगतांना सरधोपट एकच सल्ला देऊन चालत नाही. साधक साधकात फरक असतो. ज्याला त्याला त्याच्या त्याच्या पातळीनुसार आणि गरजेनुसार साधना सांगणे आवश्यक असते. तरच लाभ घडून येतो. अन्यथा उपासना केवळ औपचारिकता म्हणून केली जाते.
Posted On : 13 Aug 2018

Subscribe to our newsletter

Get monthly email updates about our Yoga and Spirituality articles as they get added to our websites.